पुणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील तारखेला म्हणजे १९ ऑगस्ट रोजी पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवारी दिला आहे. राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य आणि विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरीत न्यायालयाने राहुल गांधींना न्यायालयामध्ये हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. स्वा. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींंविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता.
या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पब, बारमध्ये कठोर नियम लागू; रात्री किती वाजेपर्यंत सुरु राहणार?
-तुमची मुले मोबाईलमध्ये अडल्ट Video पाहतात का? मग आजच मोबाईचे ‘हे’ सेटिंग्ज चेंज करा
-महिलांसाठी महत्वाची बातमी; दरवर्षी करा ‘या’ ६ मेडिकल टेस्ट नक्कीच करा, टळू शकतो गंभीर आजारांचा धोका
-पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले उदयनराजे भोसलेंच्या विजयाचे बॅनर; चर्चेला उधाण
-Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे