पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीचा फक्त निकाल लागणं बाकी आहे. येत्या ४ जून रोजी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वीच राज्यभरात अनेक हौशी कार्यकर्त्यांकडून उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लावण्यात येत आहेत. पुणे शहरात गेल्या काही आठवड्यांपूर्वी पुणे लोककसभेचे उमेदवार, भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले होते.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे पोस्टर भोर तालुक्यात लावण्यात आले होते. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये, तर थेट साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. खंडोबा माळ परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. यापूर्वी शहरात अमोल कोल्हे, संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे सुद्धा बॅनर झळकले आहेत.
दरम्यान,निकाल लागण्याधीच उदयनराजे यांना खासदारकीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. याआधी शहरात अमोल कोल्हे, संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांचे फ्लेक्स झळकले होते. त्या पाठोपाठ आता उदयनराजेंचे फ्लेक्स झळकत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | ‘पोर्शे कार प्रकरणामुळे पुण्याचा भोंगळ कारभार उघडकीस’- सुषमा अंधारे
-पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप
-अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?
-रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?