पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातनंतर शहरामध्ये चालणारे अवैध पब आणि ड्रग्ज प्रकरण चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. कल्याणीनगर अपघातानंतर अगदी सविस्तरपणे सर्व घटनाक्रम मांडत आवाज उठवणारे रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पहायला मिळाले आहे.
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर आणि उत्पादन शुल्क विभागावर आणि पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांवर केलेले आरोप केले. यावरुन शंभूराज देसाई यांनी रवींद्र धंगेकरांना याप्रकरणी नोटीस धाडणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार आहे. यावरुन सुषमा अंधारे यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणाने इथल्या गृह, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य & वैद्यकीय खात्यातील भोंगळ कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत.
& नेहमीप्रमाणे याची जबाबदारी न स्वीकारता शंभूराज देसाई अब्रू नुकसानीच्या दाव्याची नोटीस मला पाठवत आहेत..Lol😅
बूंदसे गई सो हौद से नही आती है !!— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 30, 2024
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप
-अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?
-रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?
-जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक; हडपसरमध्ये तीव्र आंदोलन