पुणे : पुणे शहारामध्ये अनेक भागात आयटी कंंपन्या आहेत. हिंजेवाडी, कल्याणीनगर, मगरपट्टा अशा ठिकाणी आयटी कंपन्या आहेत. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणामुळे काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर रवींद्र धंगेकरांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.
हिंजवडी आयटी पार्क मधून तब्बल ३७ कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे.
एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं….… pic.twitter.com/kRGZ71EYPB— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 29, 2024
‘पुण्यातील आयटी हबमधून ३७ कंपन्यांचे स्थलांतर झाल्याचे रवींद्र धंगेकर यांनी म्हणाले आहे. मात्र, रवींद्र धंगेकरांच्या आरोपात किती तथ्य आणि किती सत्य हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणे शहरातील हिंजवडी परसिरात मोठे आयटी पार्क उभारण्यात आले आहे. या आयटी पार्कमध्ये शेकडो आयटी कंपन्या कार्यरत असून हजारो आयटी इंजिनिअर्संना हक्काची नोकरी मिळाली आहे. या आयटी हबमुळे पुण्याच्या वैभवात मोठी वाढ झाली असून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण नोकरीसाठी पुण्यात येत आहेत. त्यामुळे, पुण्याचा आर्थिक विकास आणि नागरीकरण वाढीस लागले आहेत’, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
‘गेल्या १० ते १५ वर्षात पुण्यात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे, साहजिकच पुण्याचा विस्तार आणि लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडीही वाढली आहे. मात्र, याच वाहतूक कोंडीचं कारण देत काही कंपन्या पुण्यातून स्थलांतरीत झाल्या आहेत’, असे रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अमितेश कुमार सकाळी ७ वाजता अजित पवारांच्या बंगल्यावर; अपघात प्रकरणी काय चर्चा झाली?
-रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?
-जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक; हडपसरमध्ये तीव्र आंदोलन
-‘जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर…’; सुषमा अंधारेंनी केली आव्हाडांची पाठराखण