पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणावरुन अनेक वेगवेगळी प्रकरणं गंभीरपणे बाहेर येत आहेत. अपघातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्या प्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
अशातच आत्ता बी. जे. मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना काल तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून त्यांच्या जागेवर अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. आज अतिरिक्त कार्यभार स्वीकारणारे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांनी ससून हॉस्पिटलचा कार्यभार स्वीकारला असून त्यांनी ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांबरोबर पाहणी करत विभाग प्रमुखांची बैठक बोलावली आहे.
मी आज सकाळीच ससून हॉस्पिटलचा पदभार स्वीकारला आहे. हॉस्पिटलमधील वॉर्ड, ओपीडी तसेच हॉस्पिटलमधील सर्व विभागाची पाहणी करण्यात आलेली आहे. तसेच आज बी. जे. मेडिकल कॉलेजची कौन्सिलिंग देखील करण्यात येणार आहे. तसेच आज विभाग प्रमुखांची देखील बैठक घेऊन रुग्णसेवा कशी सुधारता येईल आणि येथील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण कश्या पद्धतीने देण्यात येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच जी काही घटना घडली आहे, यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल”, असे अस यावेळी डॉ. चंद्रकांत म्हस्के म्हणाले पदभार स्विकारल्यानंतर म्हणाले आहेत.
‘ससून हॉस्पिटलच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावण्यात आली असून सर्वांनी नियमानुसार काम करावं’ अशी सक्त ताकीद देखील यावेळी डॉ. म्हस्के यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रवींद्र धंगेकर अडचणीत येणार, मंत्र्यांनी दिला थेट इशारा; नेमकं प्रकरण काय?
-जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक; हडपसरमध्ये तीव्र आंदोलन
-‘जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर…’; सुषमा अंधारेंनी केली आव्हाडांची पाठराखण
-राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक चरणसिंह राजपूत अचणीत; होणार कारवाई?