पुणे : ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे चवदार तळ्याच्या परिसरामध्ये आंदोलन केले. ‘मनुस्मृती’ ग्रंथाचे दहन केले. मात्र, या आंदोलनादरम्यान आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्याने आव्हाडांवर विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आव्हाडांचा पाठराखण करत टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र असे कोणतेही स्पष्टीकरण मागत नाही आणि शत्रू त्यावर विश्वास ठेवत नाही. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार मांडलेल्या भूमिका आणि केलेली आंदोलन सर्वांना ज्ञात आहे. शिवाय नकळतपणे घडलेल्या कृतीबद्दल त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली आहे”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट केली आहे.
‘जर जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर आव्हाड ज्या मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होण्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत होते यावर तुमचं मत काय आहे? बाबासाहेब आणि बाबासाहेब यांच्या प्रत्येक कृतीबद्दल जर अभिमान असेल तर मग भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचाराला कारणीभूत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या बद्दल थेट भूमिका या छुपे किंवा उघड समर्थकांनी का घेतली नाही? तुम्ही या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही कारण तुमचा बौद्धिक हलकटपणा चळवळीत काम करणारे सच्चे कार्यकर्ते अभ्यासक आणि लढवय्ये चळवळे लोक जाणून आहेत”, असंही सुषमा अंधारे आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-राज्य उत्पादन शुल्कचे अधिक्षक चरणसिंह राजपूत अचणीत; होणार कारवाई?
-जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार, डॉ. बाबासाहेबांचा फोटो फाडण महागात पडणार? नेमकं काय घडलं?
-पुणे पोलिसांकडून कॅफेवर छापा; धक्कादायक वास्तव आलं समोर, अंधारात…
-‘थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स करणाऱ्याला समज द्या’; अंजली दमानिया कोणामुळे संतापल्या?