पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी उपमुख्यंमत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. यावरुन अजित पवार गटातील नेत्यांनी दमानिया यांच्यावर संताप व्यक्त करत टीकेची झोड उठवली आहे. अंजली दमानिया यांनी या पुणे अपघात प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांना या प्रकरणावर बोलायला ४ दिवस का लागले, असा सवाल उपस्थित केला होता. यावर बोलताना अजित पवार गटाचे सूरज चव्हाण यांनी दमानियांवर टीका केली. सूरज चव्हाण यांनी केलेल्या टीकेवरुन दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
“अजित पवार, आज प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ? आज मला त्या सूरज चव्हाणने “रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले? मला? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता?”, असे म्हणत अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
अंजली दमानिया यांचे ट्वीट
अजित पवार @AjitPawarSpeaks
आज प्रचंड राग आला आहे.
तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ?
शी।
आज मला त्या सूरज चव्हाण ने
“रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले ?
मला ? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 29, 2024
“अंजली दमानिया यांच्यावर मी टीका केली होती. कारण सातत्याने अजित पवार यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. आमच्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तीची नार्को टेस्ट व्हायला हवी. मागील एक महिन्याचे त्यांचे कॉल डिटेल्स चेक करायला हवं कारण त्या राजकीय पक्षाचा सुपाऱ्या घेउन बदनाम करत आहे.” असे सूरज चव्हाण म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, पण…’, कालीचरण महाराजांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य
-पुणे हिट अँड रन: “या प्रकरणात आमदाराचा मुलगा, २ उपमुख्यमंत्री…”; नाना पटोलेंने केले धडाधड आरोप
Benefits of soaked dates : आरोग्यासाठी खजूर वरदान! जाणून घ्या ‘हे’ चमत्कारीक फायदे
-नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’
-मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार