पुणे : पुणे शहरात १९ मे मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत बड्या बिल्डरपुत्राने अलिशान कारने बाईकवरुन जाणाऱ्या दोघांना जबर धडक दिली आहे. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर राज्याच्या राजकारणात मोठे वादंग सुरु आहे. या अपघातानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन आरोपी १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त करण्यात आला आहे.
या अपघात प्रकरणातील आरोपी मुलाला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले असून त्याच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आता नाना पटोलेंनी धक्कादायक आरोप केला आहे. “पुणे पोर्शे अपघात प्रकरणात सापळे कमिटीची निर्मिती राज्य सरकारने केली आहे. मात्र डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडे भाडे तत्त्वावरची कार आहे. त्या कारचा देखभाल खर्च १ लाख रुपये आहे. अनेक ठिकाणी त्यांची बदली झाली होती. त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठले आहेत. पोर्शे अपघात प्रकरणात दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ससून रुग्णालय, पोलीस विभाग आणि राज्यकर्त्यांचे लोक यांना वाचवण्यासाठी ही कमिटी निर्माण केली गेली आहे”, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
“या प्रकरणात आमदाराचा मुलगाही होता”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे सांगितलं पाहिजे की डॉ. तावरेंची नियुक्ती कुणाच्या सांगण्यावरुन झाली आहे? कुठल्या आमदाराने पोलीस आणि डॉक्टरांशी बोलत होते? त्या कारमध्ये कोण होतं? ते अजून कळलेलं नाही. ही नावं का लपवली जातात? पोर्श कार प्रकरणात ज्या पबमधून निघाली होती दोन कार्सची रेस लागली होती. या रेसमध्ये या पोर्शेने २ निरपराध जीव घेतले. आरोपींना निबंध लिहायला लावणं म्हणजे तर मोठी थट्टा आहे. कितीवेळा चिरडू शकता हे विचारायचं होतं का? या घटनेत आमदाराचा मुलगाही होता. आम्ही त्याचं नाव सांगणार नाही ते नाव सरकारने जाहीर करावे या प्रकरणात २ उपमुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
Benefits of soaked dates : आरोग्यासाठी खजूर वरदान! जाणून घ्या ‘हे’ चमत्कारीक फायदे
-नताशा-हार्दिकचा घटस्फोट; जवळच्या मित्राने दिली महत्वाची माहिती, ‘अनेक महिन्यांपासू दोघेही…’
-मराठ्यांचा नवा सरदार ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचेही भव्य स्मारक उभारणार; युवा उद्योजक पुनीत बालन यांची घोषणा
-‘पोर्शे कार प्रकरण अन् आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ’; ४ जूननंतर सुषमा अंधारे करणार धक्कादायक खुलासे