पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघाताचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले. हे प्रकरण चांगलेच चिघळल्याचे पाहता प्रशासनाने कारावाईचा बडगा उगारला, खोलात जात तपास सुरु केला. या पुणे हिट अँड रन प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होते आहेत.
या प्रकरणात एकाच कुटुंबातील तीन पिढ्या कारागृहात आहेत. अल्पवयीन आरोपी प्रसिद्ध बड्या बिल्डरचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी कायदा, नियमांना धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न झाला. आधी ड्रायव्हरला डांबून ठेवणं, खोटी कबुली द्यायला लावणं, त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टर्सना पैसे चारून रक्ताचे नमुने बदलणं असे अनेक प्रकार घडले. या प्रकरणावरुन राजकारण देखील सुरु आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये या प्रकरणावरुन चांगेलीच जुंपल्याचेही पहायला मिळत आहे.
अपघात या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. त्यातच आतापुणे अपघात प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे १० मिनिटे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलले. पुणे हिट एंड रन प्रकरणांमध्ये आरोपींची सखोल चौकशी करा. बिल्डर, मंत्री, आमदार, खासदार कुणाचाही सहभाग असल्यास या प्रकरणात त्यांना ही आरोपी करा. समाजात या प्रकरणाच्या माध्यमातून चांगला संदेश जायला हवा. या प्रकरणात सामील असलेल्या शेवटच्या आरोपीपर्यंत पोहोचण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पोलीस कारवाईचा बार मालकांनी घेतला धसका, “आता टेबलवर ग्राहकांना दिला जातोय….”
-मलायका आरोराच्या ‘त्या’ कृत्यामुळे सर्वत्र होतंय कौतुक; सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
-कल्याणीनगर अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम; ‘माझ्या समोर ती मुलगी हवेत उडाली अन्…’
-Pune Hit & Run : ”ते’ पाप भाजपने केलंय, फडणवीसांची भूमिका संशयास्पद’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप