Malaika Arora : बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री मलायका आरोरा ही नेहमीच तिच्या फिटनेस, नृत्यामुळे चर्चेत असते. मलायका ही आज वेगळ्या ओळखीची गरज नाही कारण मलायका तिच्या सिनेसृष्टीतील तसेच वैयक्तीक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. सध्या मलायकाचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलायका या व्हिडीओमध्ये रस्त्यावर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. मलायकाच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे.
फिटनेस फ्रिक अभिनेत्री म्हणून मलायका अरोराकडे पाहिले जाते. मलायका नेहमीप्रमाणे जीमसाठी जात होती. तेवढ्यात तिला रस्त्यात कचरा दिसला. तेव्हा मलायकाने सर्व कचरा हाताने गोळा करत आत असलेल्या कचरापेटीत टाकला. मलायका हिची ही कृती पाहून चाहते देखील अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मलायका हिच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
गेल्या अनेक वर्षांपासून मलायक अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. मलायका सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर मलायकाचा चाहता वर्ग काही कमी नाही. मलायका फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
महत्वाच्या बातम्या-
-कल्याणीनगर अपघाताच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम; ‘माझ्या समोर ती मुलगी हवेत उडाली अन्…’
-Pune Hit & Run : ”ते’ पाप भाजपने केलंय, फडणवीसांची भूमिका संशयास्पद’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
-“सुप्रिया सुळेंमुळेच सगळे शरद पवारांना सोडून जात आहेत, मी आणि धीरज शर्मादेखील…”
-“मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण फक्त…”-रवींद्र धंगेकर
-हिट अँड रन प्रकरण: बिल्डर बाप-लेकाची पोलीस कोठडी वाढवली, कोर्टात आज नेमकं काय घडलं?