पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताची घटना ही वाऱ्यासारखी सर्व राज्यभर पसरली आहे. त्यातच या प्रकरणावरुन सर्व स्तारातून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत असल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहेत. त्यातच आता या घटनेमध्ये प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. टिव्ही९ मराठीशी बोलताना प्रत्यक्षदर्शी आमिन शेख यांनी घटनाक्रम सांगितला आहे.
“मी त्या ठिकाणी थांबलो होतो. उजवीकडे कुठलीही गाडी नव्हती. समोरुन गर्दी झाली होती. दोन रिक्षाचालक होते रस्त्याच्या मधे पोहचणार इतक्या अत्यंत वेगात पोर्श कार माझ्या मागून गेली. रस्ता क्रॉस करतानाच कार माझ्या मागून गेली आणि जोरात धडकेचा आवाज आला. मुलगी (अश्विनी कोस्टा) माझ्यासमोर हवेत वर उडाली आणि जोरात खाली आदळली. तिचा ऑन स्पॉट मृत्यू झाला. मी पळत गेलो पाहिलं तर तरूणीची हालचाल बंद झाली होती. एका मुलीने कपडा दिला तो त्या तरूणीच्या अंगावर टाकला. त्यानंतर जमलेल्या जमावाने गाडीतून दोन जणांना बाहेर काढले आणि त्यांना मारहाण करायला सुरूवात केली”, असे प्रत्यक्षदर्शी आमिन शेख यांनी सांगितले आहे.
मारहाण होत असताना ‘दोघेही जे काही नुकसान झालं आहे ते भरून द्यायला आम्ही तयार आहोत फक्त आम्हाला मारू नका’ असे म्हणक होते. गाडीत तिघेजण होते त्यातील एकजण आधीच पळून गेला होता. आम्ही त्यांना पाहिले तेव्हा ते सगळे दारुच्या नशेत होते. हे स्पष्ट दिसत होते, कारण त्यांना सरळ उभेही राहता येत नव्हते. मारहाण होत असताना ते फक्त इतकेच बोलत होते की, ‘आम्हाला मारू नका जे काही पैसे आहेत ते आम्ही द्यायला तयार आहोत’, असे प्रत्यक्षदर्शी शेख यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run : ”ते’ पाप भाजपने केलंय, फडणवीसांची भूमिका संशयास्पद’; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
-“सुप्रिया सुळेंमुळेच सगळे शरद पवारांना सोडून जात आहेत, मी आणि धीरज शर्मादेखील…”
-“मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण फक्त…”-रवींद्र धंगेकर
-हिट अँड रन प्रकरण: बिल्डर बाप-लेकाची पोलीस कोठडी वाढवली, कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run : “अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे”