पुणे : राज्यातील राजकाराणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असे दोन गट पडले आहेत. तसेच अनेक राजकीय नेते पक्षांतर करत असतात. शरद पवार गटातील अनेक नेते शरद पवारांची साथ सोडताना दिसत आहेत. त्यातच आता शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू नेत्या सोनिया दुहान यांनी खासदार सुप्रिया सुळेंवर ठपका ठेवत पक्षाला राम राम करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
सोनिया दुहान काय म्हणाल्या?
“मी शरद पवारांचा पक्ष सोडलेला नाही, दुसऱ्या पक्षात गेलेले नाही. अजित पवारांच्या पक्षातही मी गेलेले नाही. शरद पवारांशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ असलेले विश्वासू नेते, कार्यकर्ते त्यांची साथ का सोडत आहेत? हा विचार सुप्रिया सुळेंनी केला पाहिजे. काही दशकांपासून शरद पवारांबरोबर आहेत जे पक्ष सोडत आहेत. आम्ही शरद पवारांचे निकटवर्तीय आहोत जवळचे आहोत आम्ही आता पक्ष सोडायचं ठरवलं आहे. याला तुम्ही ऑल इज वेल म्हणाल का? नक्कीच नाही. शरद पवारांच्या पक्षात फार काही बरं चित्र नाही.”
“अशी माणसं चालणार नाहीत जे लीडर्स नाहीत. मी जबाबदारीने सांगते आहे की सुप्रिया सुळेंमुळे मी पक्ष सोडला आहे. धीरज शर्मा यांनीही याच कारणामुळे पक्ष सोडला आहे. मला काढून टाकतील किंवा मी राजीनामा देईन. आजवर साधा फोन कुणाला आलेला नाही. नाराजीचं कारण विचारण्यात आलेलं नाही”, असे म्हणत सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंवर टीकेची झोड उठवली आहे.
मी आणि धीरज शर्मा सुप्रिया सुळेंमुळे पक्ष सोडतो आहोत. शरद पवार पक्षाचे अध्यक्ष होते तोपर्यंत सगळं बरं चाललं होतं. सुप्रिया सुळेंकडे पक्ष गेल्यानंतर वातावरण बिघडलं यावर विचार झाला पाहिजे. सध्या माझी रणनीती काहीही नाही. डोक्यावरुन पाणी गेले आहे त्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे, असेही सोनिया दुहान म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण फक्त…”-रवींद्र धंगेकर
-हिट अँड रन प्रकरण: बिल्डर बाप-लेकाची पोलीस कोठडी वाढवली, कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run : “अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे”
-कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी