पुणे : शहरातील कल्याणीनगर येथे १९ मे रोजी रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. यानंतर ‘रवींद्र धंगेकर यांना जाहीर माफी मागा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करेल, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला होता. त्यावर आमदार धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने नेमलेली एसआयटी समिती मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयामध्ये दाखल झाली. यावेळी धंगेकरांनी त्या समितीची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र ते शरद पवार यांना सोडून पळून का गेले? हे सर्वांनाच माहिती आहे. ते आदरणीय आहेत, त्यामुळे मी त्यांची माफी नाही तर त्यांना दंडवत घालीन त्यांच्या पाया पडेल, पण पुण्यामध्ये सुरु असलेली पब-संस्कृती संपली तर मी हे करेल. अब्रु नुकसानीचा दावा त्यांनी दाखल करावा, परंतु माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीच नाही”, असे म्हणत रवींद्र धंगेकरांनी खोचक टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-हिट अँड रन प्रकरण: बिल्डर बाप-लेकाची पोलीस कोठडी वाढवली, कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run : “अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे”
-कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी