पुणे : पुणे शहरात झालेल्या अपघातामध्ये २ तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे राज्यात सर्व स्तरावर तीव्र पडसाद उमटले आहेत. यावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. त्यातच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांना तसेच पोलीस प्रशासनासह रुग्णालयावरही गंभीर आरोप केले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे या अपघात प्रकरणापासून दूर असल्याने त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहे.
या अपघातप्रकरणी अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार केला. अजित पवारांनी केलेला हा फोनवरुनही मोठा वाद निर्माण झाला. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनीही अजित पवारांवर चांगलाच निशाणा साधला आहे. अंजली दमानिया यांनी आज माध्यमांशी बोलताना थेट अजित पवारांच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे.
“सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुण्यात राहून पालकमंत्र्यांचा कंट्रोल खूप जास्त आहे. पुण्यातील दगड, माती, धोंडे जरी घ्यायचे असेल तरी ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून घ्यावे लागतात. ससून रुग्णालय असो किंवा पोलीस यंत्रणा सगळीकडे अजित पवारांच्या जवळचे आहेत. अजित पवारांचा फोन जप्त झाला पाहिजे मग ते कोणी असो उपमुख्यमंत्री का असेना”, असे म्हणत अंजली दमानिया यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
“अजित पवारांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे”
“अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेत अजित पवार फार वेगळे होते. खरंतर त्यांनी सरळ सरळ पुण्याच्या मुद्द्यावर हात घालायला पाहिजे होता. पण इतर गोष्टी मांडल्यानंतर पुण्याच्या घटनेवर थोडेसे बोलले. ज्या पद्धतीने ते बोलले आपण सर्वांनी पाहिले. त्यांच्या मनासारखे झाले नाही तर ते भडकणारे अजित पवार किंवा त्यांना जे जे हवं तेथे झाले नाही तर ते विरोधी पक्षावर देखील भडकतात. त्यांची देहबोली अतिशय गांगरल्यासारखी होती ते धादांत खोटे बोलत होते. जो मी आधी प्रश्न मांडला होता त्यांना या प्रश्नावर बोलायला चार दिवस का लागले. कालचा त्यांचा जो तोरा होता त्यावरून मला असे वाटते. ते धादांत खोटे बोलत आहे त्यांची नार्को टेस्ट सुद्धा झाली पाहिजे त्यांच्या फोनची पूर्ण तपासणी झाली पाहिजे आणि पूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या-
-कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी
-‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी