पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातमध्ये रोज धक्कादायक खुलासे होत आहेत. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने अलिशान कार चालवत दोघांना चिरडले आहे. या घटनेनंतर गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीला तसेच या प्रकरणातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात आले आहे.
घटना घडली तेव्हा आरोपीने मद्य प्राशन केले होते की नाही याची खात्री करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नुमने घेण्यात आले मात्र हे नमुनेही बदलण्यात आले अन् खोटे रिपोर्ट तयार करण्यात आले. यावरुन ससून रुग्णालयातील २ डॉक्टरांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच यामध्ये खोलात जाऊन चौकशी करण्यासाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ही डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर सोपवली आहे. मात्र याच सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचे ढीगभर आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्या निवडीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच आता यावर समितीच्या स्थापनेवर माजी आयएअस अधिकारी आणि राज्याच्या अन्न व औषध विभागाचे प्रधान सचिव महेश झगडे यांनी देखील या समितीवर आक्षेप घेतले आहेत.
पोर्श-ससून प्रकरणातिल डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून “उंदराला मांजर साक्ष” हि म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर वरिष्ठांनी बांधलेला नाही ना?राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा! pic.twitter.com/LDd7TUMNmW
— Mahesh Zagade, IASx (@MaheshZagade07) May 28, 2024
“या प्रकरणात अडकलेल्या दोषी डॉक्टर्सची चौकशी करण्यासाठी इतर काही गंभीर प्रकरणात अडकलेल्या दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करणे म्हणजे उंदराला मांजरा साक्ष ही म्हण पुनर्जिवित करण्याचा चंग तर वरिष्ठांनी बांधलेला नाही ना? राज्यात या चौकशीसाठी इतर त्रयस्थ व्यक्ती उपलब्ध नसतील तर त्रयस्थांचा दुष्काळ जाहीर करावा”, असे महेश झगडे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कमी वयात म्हातारे दिसण्याची मुख्य कारणे; चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी आजच बदला ‘या’ सवयी
-‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी
-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण