Skin Care : आजच्या प्रदुषणाच्या काळात त्वचेसंबंधी अनेक समस्या उद्भवताना दिसत आहे. सध्या या संबंधित समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. या समस्येमधील महत्वाची अँटी एजींग ही गंभीर समस्या आहे. अनेक महिलांना लवकरच वृद्धत्वाचा सामना करावा लागतो. याला जबाबदार त्या स्वत:च असतात. वय वाढणे हे नैसर्गिक आहे. आनुवंशिकता हे देखील वृद्ध होण्यास जबाबदार असू शकते मात्र, वृद्धत्वास कारणीभूत असणाऱ्या इतर गोष्टींवर नियंत्रण ठेवणेही आवश्यक आहे.
आपण आपल्या जीवनशैलीमध्ये अशा अनेक गोष्टींच्या सवयी लावून घेत असतो की ज्या आपल्याला लवकर वृद्ध बनवतात. पण तुम्ही या सवयी सुधारु शकता. आपण आपल्या त्वचेला लवकर वृद्ध होण्यापासून वाचवतात. त्वचेच्या अकाली वृद्धत्वामुळे सुरकुत्या, बारीक रेषा, काळी वर्तुळे अशा समस्या उद्भवू शकतात.
शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, त्वचेची लवचिकता आणि कोलेजन प्रभावित होतात, ज्यामुळे त्वचा सैल होते म्हणजेच त्वचेवर सुरकत्या पहायला मिळतात. अकाली वृद्धत्वाव्यतिरिक्त, तुमच्या निष्काळजीपणामुळे त्वचेशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. आपल्या शरिराला आरोग्याला आवश्यक तितकी झोप आण घेणे गरजेचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या त्वचेवर याचे परिणाम होतात. यामुळे त्वचेचे इलेस्टिन कमी होऊन डोळ्याभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात. त्यामुळे झोपेची वेळ निश्चित केली पाहिजे.
अधिक काळ सुर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे देखील लवकर वृद्धत्व येऊ शकते. ज्याला फोटोएजिंगही बोलले जाते. सूुर्यप्रकाशामधील अल्ट्राव्हायोलेट किरण त्वचेच्या कोलेजन आणि इलास्टिन तंतूंना नुकसान करतात. त्यामुळे त्वचेची लवचिकता कमी होऊन सुरकुत्या आणि वृद्धत्वाची चिन्हे दिसू शकतात. यासाठी सुर्यकिरणांच्या संपर्कात येण्यापूर्वी पुरेशा प्रमाणात सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे आहे. तुमच्या त्वचेनुसार सनस्क्रीन निवडणे आवश्यक आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळेही त्वचेचे वय वाढत असते. सततच्या धूम्रपानाच्या सवयीमुळे तुमचे वय अकाली होऊ शकते. सिगारेटच्या धुरामुळे कोलेजन आणि इलास्टिनचे नुकसान होते. धूम्रपानामुळे अकाली वृद्धत्व जसे की सुरकुत्या आणि बारीक रेषा होतात आणि त्वचेचा रंगही निस्तेज होतो. त्यामुळे धुम्रपान करणे टाळावे.
आपल्याला असणाऱ्या तणावामुळे आपले शरीर ‘एड्रेनालाईन’ आणि ‘कोर्टिसोल’सारखे हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे त्वचेच्या कोलेजन आणि इलास्टिनला नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, तणाव आपल्या झोपेमध्येही अडचणीचा मुद्दा ठरतो. परिणामी त्वचेच्या अकाली वृद्धत्वात योगदान देतो.
महत्वाच्या बातम्या-
-‘ससूनच्या गेल्या ५ वर्षांच्या कामाचं रेकॉर्ड काढा अन्…’; सुप्रिया सुळेंची सरकारकडे महत्वाची मागणी
-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण
-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?