पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात पोर्शे कार अपघातावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या अपघात प्रकरणापासून ससून रुग्णालयातील गैरकारभार वारंवार समोर येत आहे. या अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताची चाचणी करताना रक्ताच्या नमुन्यांमधे बदल करण्यात आला. यावरुन ससून रुग्णालयातील डॉक्टरांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसेच याप्रकरणी तपासासाठी एसआयटी समितीही स्थापन करण्यात आली आहे. ससून रुग्णालयामधील व्यवस्थापनावर सातत्याने होणाऱ्या आरोपांवरुन बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शासनाकडे महत्त्वाची विनंती केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“काही लोकांनी गैरकृत्य केले असेल तर त्यामुळे इतरांकडेही संशयाने पाहिले जाणे योग्य नाही. तसेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी शासकीय संस्था अशाप्रकारे संशयाच्या भोवऱ्यात अडकणे हे चांगले लक्षण नाही. म्हणूनच रुग्णालय प्रशासनाच्या एकंदर कामकाजाची समिक्षा होणे आवश्यक आहे. माझी शासनाकडे मागणी आहे की, आपण ससूनच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाबाबत श्वेतपत्रिका काढून ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके काढून टाकण्यासाठी उपाययोजना करावी”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे.
पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या…
— Supriya Sule (@supriya_sule) May 28, 2024
“पुणे जिल्हा आणि परिसरातील गोरगरीब रुग्णांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यात ससून रुग्णालयाने सिंहाचा वाटा उचलला आहे. परंतु गेली काही दिवसांपासून या रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणी हे रुग्णालय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. आणि आता कल्याणीनगर ‘हिट ॲन्ड रन’ प्रकरणी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचे प्रकरण चर्चेत आहे. याप्रकरणी २ वरीष्ठ डॉक्टरांना अटक देखील करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिमा काही प्रमाणात डागाळली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज असून दोषी व्यक्तींना कठोर शासन व्हायला हव”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण
-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?
-‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल