पुणे : पुणे शहरातील पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे शहरासह राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्याच या अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयामधील २ डॉक्टरांना पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीचे नमुने बदलून त्याचा बचाव करण्याचा प्रयत्न ससून रुग्णालयामध्ये झाला आहे. अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे वडिल शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे पुरवले. या प्रकरणात ससून रुग्णालयातील गैरप्रकारासंबंधित चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे.
पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील एसआयटी समितीच्या अध्यक्षावरच भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचे समोर आले आहे. पोर्शे अपघात प्रकरणात ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे. या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणी नेमलेल्या SITच्या अध्यक्षपदी असणाऱ्या डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच भ्रष्टाचाराचे ढिगाने आरोप आहेत. हे आरोप शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवानी केलेले आहेत.
रक्तनमुने तपासायला येणाऱ्या डॉ. सापळे यांनी रक्तातला प्लाजमा विकून 13लाख रुपये खाल्ल्याचा आरोप आहे ! pic.twitter.com/dO7yY0LHMb— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 28, 2024
डॉ. सापळे भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्याचे एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करतात. हा खर्च ७० ते ८० लाख रुपये आहे. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्तसंक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझ्मा विकून शासनाच्या परवानगीशिवाय त्यांनी १३ लाख रुपये जमा केले. या पैशातून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचे सांगितले असल्याचाही गंभीर आरोप डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आहे.
जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत. ‘रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर ५ ते १० टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत’, असा आरोप सापळे यांच्यावर केला होता. हा मुद्दा विधानसभेत सुद्धा चर्चेत आला होता. असा गंभीर आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील एसआयटी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कल्याणीनगर अपघाताबाबत दादांनी पोलीस आयुक्तांना का फोन केला? अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण
-पुणे अपघात प्रकरणाला वेगळं वळण; ‘त्या’ आमदाराच्या फोननंतर आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलले?
-‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल
-‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी