पुणे : पुणे शहरातील कल्यणीनगर भागात झालेल्या अपघातामुळे राज्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत. या प्रकरणाबाबत रोज नवे खुलासे होत आहेत. या प्रकरणाला राजकीय वळण असल्याने सर्व स्तरामधून सत्ताधारी आणि पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठवली जात आहे. हा अपघात झाल्यानंतर या प्रकरणामध्ये सुरवातीला पोलिसांवर दबाव आणत आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर हा आरोप करण्यात आला आहे.
आता या हिट अॅन्ड रन अपघात प्रकरणामध्ये अजून एक मोठा खुलासा समोर आला आहे. याचे कनेक्शन थेट आमदार सुनील टिंगरे यांच्यापर्यंत पोहचत असल्याचे समोर आले आहे. बड्या बिल्डरच्या लेकाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयामध्ये ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या २ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
डॉ. अजय तावरे यांच्या चौकशीदरम्यान या सर्व घटनेमध्ये आरोपीचे पहिल्यांदा घेतलेले रक्ताचे सॅम्पल हे डॉ. अजय तावरे यांच्या सांगण्यावरुन डॉ. श्रीहरी हळनोर यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकल्याचे समोर आले. त्यातच डॉ. तावरे यांना आरोपीच्या वडिलांचा फोन आल्याचे कॉल डिटेल्समधून समोर आले आहे. रविवारी पहाटे अपघातानंतर एका आमदाराचाही डॉ. तावरे यांना फोन आला असल्याचेही आता तपासातून समोर आले आहे. त्यामुळे आता डॉ. तावरे यांना फोन करणारा आमदार नेमका कोण आणि त्याच आमदाराने आरोपीचे ब्लड सॅम्पल बदण्यास सांगितले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीलाच बिल्डर पुत्राला वाचण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे, परंतु त्यांनी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते. आज अटक करण्यात आलेले डॉ. अजय तावरे यांची नियुक्ती ससून रुग्णालयात करण्यासाठी आमदार टिंगरे यांनीच शिफारस केल्याची बाबा आता समोर आली आहे. त्यामुळे हिट अँड रन प्रकरणात सुनील टिंगरे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चिले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘एक बोट दुसऱ्याकडे दाखवता तेव्हा ४ बोटं तुमच्याकडे वळतात’; शिंदे गटाचे धंगेकर, अंधारेंना खडेबोल
-‘…तर मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा’; अंजली दमानियांची मागणी
-धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?
-Pune Hit & Run | ‘रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर…’; हसन मुश्रीफ यांचा इशारा