पुणे : पुणे शहरातील झालेल्या अपघात प्रकरणावरुन राजकारणात अनेक नवे वाद उभे राहत आहेत. दररोज नवे खुलासे होत आहेत. त्यातच आता या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोलिसांना सवाल केला आहे. या अपघाताप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना फोन केला होता का? फोन केला असेल तर अजित पवारांचा मुख्यमंत्री राजीनामा घेतील का?’, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
‘अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत हा प्रश्न पुणे पोलिसांना विचारला आहे. त्या ट्वीटमध्ये मी माझ्या मनातील शंका उपस्थित केल्या होत्या. पुण्याच्या भीषण अपघातात दोन जणांचा जीव घेतला. एका श्रीमंताच्या मुलाला वाचवण्यासाठी सर्व पोलीस यंत्रणा काम करत आहे असे काहीसे चित्र होते. त्याच्या मागे कोण होते? अशी शंका माझ्या मनात होती. म्हणून मी ते ट्वीट डीलिट केली. परंतु माझी शंका आता खरी ठरत आहे की काय असे वाटत आहे’, असे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
पुणे अपघात प्रकरणात अजित पवारांनी CP पुणे यांना फ़ोन केला होता का याचा ताबडतोब खुलासा CP यांनी करावा pic.twitter.com/8jNA4XLKvi
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 27, 2024
‘पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांचा फोन आला होता तर त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. फोन केला की नाही? फोन केला नसेल तर उत्तम पण केला असेल तर अजित पवारांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी आज अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी. फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांकडे राजीनाम्याची मागणी करावी’, अशी मागणी अंजली दमानीया यांनी केली आहे.
‘मी माध्यमात बातमी पाहिले की, अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन केला. हीच शंका माझ्या मनात होती. प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार पहिले चार दिवस एकही शब्द बोलले नाही. मी सकाळी उठून काम करतो म्हणारे पुण्याचे पालकमंत्री अपघाताबद्दल त्यांनी एक शब्द देखील काढला नाही. प्रत्येक वेळी सुनील टिंगरेंचे नाव पुढे येत होते. पण ही सारवासारव कोणासाठी चालली होती?’, असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी विचारला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात ७५० ग्रॅम गांजा; काय आहे नेमका हा प्रकार?
-Pune Hit & Run | ‘रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर…’; हसन मुश्रीफ यांचा इशारा
-पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run: “‘त्या’ रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, आता हळू हळू जगासमोर येईल”