पुणे : पुणे या शहराचे नाव घेताच विद्येचे माहेरघर हाच शब्द येत होता. पुण्याला विद्येचे माहेरघर, सांस्कृतीक वारसा लाभलेलं शहर असं म्हटलं जात होतं. पण आता मात्र या शहराची ओळख बददत चालल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक गुन्हे घडत आहेत. मारामारी, गोळीबार, बलात्कार, हत्या, कोयता गँग दहशत, अंमली पदार्थांची खरेदी विक्री असे प्रकार सर्सास सुरु आहेत. त्यातच नुकतेच कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरुन सर्व स्तरातून संतापाची लाट उसळली आहेत. अशातच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये गांजा सापडल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे.
काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहामध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा सापडला. विद्यापीठ प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना करत असून कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात युवासेनेने देखील विद्यापीठ प्रशासनाला निवेदन प्रसिद्ध करून येत्या २ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणावरुन आता शहरात सर्वसामान्यांसह सर्वांच्याच सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबाबत आता विविध संघटनांकडून कारवाईची मागणी पुढे येत आहे. विद्यापीठामध्ये गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | ‘रवींद्र धंगेकरांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर…’; हसन मुश्रीफ यांचा इशारा
-पुण्यात कोणत्या पबला किती हप्ता? अंधारे अन् धंगेकरांनी यादीच वाचून दाखवली; नेमकं काय घडलं?
-Pune Hit & Run: “‘त्या’ रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, आता हळू हळू जगासमोर येईल”