पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५. ८१ टक्के लागला आहे. यंदा राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. लातूर विभागातील सर्वाधिक १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
राज्याचा दहावीचा ९५.८१ टक्के निकाल
मुलींचा निकाल – ९७.२१ टक्के
मुलांचा निकाल – ९४.५६ टक्के
मुलींचा निकाल मुलांपेक्षा २.६५ टक्क्यांनी अधिक आहे.
राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल ९९ टक्के. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा निकाल ९४.७३ टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
पुणे – ९६.४४
नागपुर – ९४.७३
संभाजीनगर – ९५.१९
मुंबई – ९५.८३
कोल्हापूर – ९७.४५
अमरावती – ९५.५८
नाशिक – ९५.२८
लातूर – ९५.२७
कोकण – ९९.०१
पुणे विभागातील १०, नागपूर विभागातील १, छत्रपती संभाजीनगर विभागातील ३२, मुंबई विभागातील ८, कोल्हापूर विभागातील ३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले. तर लातूर मधील १२३ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते”