पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये अलिशान पोर्शे कारने एका बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दोघांचा चिरडले. या अपघातमध्ये दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणाची राज्यासह देशभरात चर्चा झाला. हा अपघात घडला त्याचदिवशी सकाळी ११ वाजता ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागात आरोपी अल्पवयीन वेदांत अग्रवालच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी नेण्यात आले होते. या तपासणीत फेरफार केल्याप्रकरणी २ डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अल्पवयीन वेदांत अग्रवालच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये छेडछाड केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर अशी या डॉक्टरांची नावे असून पुणे गुन्हे शाखेकडून त्यांचा चौकशी केली जात आहे. डॉ. तावरे हे ससूनच्या फोरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत.
आरोपी वेदांत अग्रवाल हा अपघातावेळी दारुच्या नशेत होता. त्याने मद्यपान केले होते का, हे तपासण्यासाठी हे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी अल्कोहोल न घेतलेल्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून दाखवण्यात आले. परिणामी अहवालात त्याच्या शरीरात अल्कोहोल नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे पोलिसांना संशय आला आहे. वेदांतच्या रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात आली.
आरोपी वेदांतची दुसऱ्यांदा रक्ताची चाचणी करण्यात आली. या चाचणीत वेदांच्या शरीरात अल्कोहोल आढळले आहे. तसेच, डीएनए चाचणीत दोन्ही चाचण्यातील रक्त नमुने वेगवेगळे असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचे संरक्षण करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुराव्यांशी छेडछाड केली असल्याचा संशय तपासकर्त्यांना आला आहे. आणि ससून रुग्णालयातील २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉ. तावरे यांना फोन केला होता, असे पोलीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-“दादागिरीने राजकारण होत नाही, नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते”
-पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा