Natasha Stankovic : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची सध्या तुफान चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर या वाऱ्यासारखी पसरत आहे. त्यातच नताशा आणि हार्दिक या दोघांच्या सोशल मीडिया अकाउंट आणि व्हायरल व्हिडीओंमुळे या चर्चांना अधिक जोर येत असून अनेक तर्त वितर्क लावले जात आहेत.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या घटस्फोटाची बातमी खरी आहे की अफवा हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच लागली आहे. सोशल मीडियावर याबाबत अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून नुकताच नताशाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नताशा आणि हार्दिक यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल अनेक चर्चा रंगत असतानाच नताशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने या व्हिडीओची देखील जोरदार चर्चा सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, नताशाचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे नताशा आणि हार्दिक या दोघांमध्ये वाद सुरु असून त्याचे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले असल्याचं बोललं जात आहे. यामुळेच नताशाला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे. मात्र, या प्रकरणाबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. काही दिवसांपूर्वी नताशा पब्लिक प्लेसमध्ये स्पॉट झाली होती. तेव्हा नताशाला घटस्फोटच्या चर्चेबाबत प्रश्न करण्यात आले. नताशाने या प्रश्नावर कोणतेही उत्तर न देता निघून गेल्याचे पहायला मिळले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा
-पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा