पुणे : पुणे शहारात अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात पोर्शे कल्याणीनगर अपघातानंतर आता पुण्यात रात्री आणखी एक अपघात झाला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामासाठी मोठा पिलर घेऊन निघालेल्या भरधाव ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावरुन चालत निघालेला हा तरुण ट्रक खाली येऊन हा अपघात घडला आहे. या अपघातामध्ये १ तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
शहरातील मेट्रोचे काम दिवसभर आणि रात्रीभरही सुरु आहे. या कामांमुळे शहरातील वाहतूकीमध्ये बदलही करण्यात आले आहेत. त्यातच रात्री बाणेर परिसरामध्ये मेट्रोचे काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. मेट्रोच्या कामासाठी रोज अनेक मोठे ट्रक पिलर्स घेऊन शहरातून प्रवास करताना दिसतात. त्यातच रात्रीची वेळ आणि रस्त्यावरची रहदारी कमी असल्याने ट्रकचालकाने ट्रकचा वेग वाढवला होता. त्याच वेळी रस्त्यावरुन जात असलेल्या एका तरुणाला या ट्रकची जबर धडक बसली.
ट्रकने दिलेल्या या धडकेत एका तरुणाच्या पायाला चांगलीच दुखापत झाली आहे. या तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात दोन्ही पाय गेल्याने तरुणाचे भविष्य अंधारात असल्यात जमा आहे. यावर मेट्रो प्रशासन काय पाऊले उचलणार. नुकसान भरपाई देणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?
-पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’
-कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’
-Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय