पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे तात्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी शिंदे सरकारने निलंबित केले आहे. डॉ. भगवान पवार यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्या प्रकरणात आणि विभागांतर्गत अर्थिक घोटाळा केल्याचा ठपका ठेवत राज्य आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. भगवान पवार यांनी गंभीर आरोप केला आहे.
‘मंत्री महोदयांनी मला कात्रज कार्यालयात बोलावून नियम बाह्य टेंडरची कामे करण्यास सांगितली. इतर खरेदी प्रकरणात दबाव आणला होता’, असा गंभीर आरोप डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केला आहे. डॉ. पवार यांच्या आरोपांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.
डॉ. भगवान पवार काय म्हणाले?
‘मी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, कात्रज कार्यालयामध्ये बोलावून मला नियमबाह्य टेंडरची कामे, इतर खरेदीत दबाव आणला, पण मी नियमबाह्य काम केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आले आहे. जुन्या तक्रारी काढून चौकशी समिती नेमून माझे निलंबन करण्यात आले आहे. मंत्री महोदयांच्या दबावामुळे हे माझे निलंबन करण्यात आले आहे’, असा दावा डॉ. भगवान पवार यांनी केला आहे. डॉ. भगवान पवार हे पुणे महापालिकेचे आरोग्य अधिकारी आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run | पोर्शे अपघातानंतर व्हायरल रॅपर वेदांत अग्रवाल नाही, मग कोणी केला ‘तो’ रॅप?
-पुणे अपघात प्रकरणी संजय शिरसाटांनी धंगेकरांना फटकारलं, म्हणाले, ‘राजकीय स्टंटबाजी थांबवा अन्…’
-कंगना रणौतचा खळबळजनक दावा; म्हणाली, ‘प्रत्येक नवीन अभिनेत्रीला दाऊदसमोर….’
-Health Update | सतत तोंड येण्याने त्रस्त आहात? मग करा घरगुती ‘हे’ गुणकारी उपाय
-पुणे अपघात प्रकरणावर धंगेकर म्हणाले, ‘फडणवीसांनी अजित पवारांचे हात पाय बांधून…’