पुणे : पुणे शहरात कल्याणीनगर भागामध्ये झालेल्या अपघातावरुन राजकीय वर्तुळामध्ये मोठा वाद उभा राहिला आहे. या प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आंदोलन केले. पुणे पोलिसांवर पैसे खाल्ल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला असून तपासात पोलिसांवर दबाव आणल्याचाही गंभीर आरोप केला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. त्यातच आता आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना रवींद्र धंगेकर यांनी या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
“शासकीय प्रश्नांमध्ये अजित पवारांना किती घेतलं जात आणि त्यांचे किती ऐकले जाते हा महत्वाचा भाग आहे. या प्रकरणापासून अजित पवारांना कोणत्या रोलला कुठे ठेवायचं, कोणता रोल दादांनी करायचा हे रोल आणखी दादांना मिळाले नाहीत. त्यामुळे दादा प्रचंड अस्वस्थ आहेत”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
View this post on Instagram
“अजितदादांना हातपाय बांधून पळायला लावलं आहे. पण अजित पवार पळू शकत नाही. त्यामुळे गृहमंत्री फडणवीसांनीच निर्णय घेतला आहेत. अजित पवारांनी पुण्यात आल्यापासून कोणाला काही तंबी दिली नाही. की कोणाला काही आदेश दिले नाहीत. अजितदादांची भाषा सैल झाली यावरुन दिसतंय की, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना हातपाय बांधून त्या खुर्चीमध्ये ठेवलं आहे. अजितदादा कोणत्या अधिकाऱ्यांना आदेश नाही दिले तर ते दादा कुठले? दादा म्हणाले धंगेकरांनी पैसे घेतल्याचे पुरावे आणावेत ही दादांची भाषा नाही. या कमिशनरला पहिला हाकलून देतो, असे यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अखेर दहावीच्या निकालाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार जाहीर
-पुणे हिट अँड रन प्रकरणावर बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, ‘जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती..’
-सेना-भाजपमध्ये ठिणगी; ‘अमित शाहांनी आम्हाला राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिलंय, त्यामुळे दरेकरांनी….’
-अक्रोड खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? अक्रोडाच्या सेवनाचे उन्हाळ्यात होतो अधिक फायदा