Health Update : आपले शरीर तंदुरस्त राहण्यासाठी अनेकजण सुका मेवा खाण्याला प्राधान्य देतात. शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता सुका मेवा भरुन काढत असतात. तुम्हाला सुका मेवा आवडत असेल आणि खात असाल तर रोज अक्रोड नक्कीच खा… कारण अक्रोड खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अक्रोड खाण्याचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत…
नियमित अक्रोड खाल्ल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि अक्रोडमध्ये असणारे ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदयाला निरोगी बनवतात.
अक्रोड खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण आणि सक्रिय होतो. अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
उन्हाळ्यात आक्रोड खाणे अधिक फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात सकाळी अक्रोड पाण्यात भिजवून खावे. यामुळे अक्रोड अधिक पौष्टिक बनते आणि उष्णतेसंबंधीत अडचणी दूर होतात.
अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे हृदयासाठीही फायदेशीर असतात. अक्रोड तणाव दूर करण्यास मदत करते. यामुळे झोप सुधारण्यास मदत करते.
रक्तदाब नियंत्रित राहण्यासही मदत होते. अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.
अक्रोडमध्ये लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
आक्रोड खाताना प्रमाणातच खावेत जास्त आक्रोड खाल्ले तर आरोग्यासंबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात.
तुम्ही रोज २-३ अक्रोड खाऊ शकता. मुलांना दररोज एक अक्रोड तुम्ही देऊ शकता.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: नातवाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरला घरात डांबलं, आता पोलिसांनी आजोबालाच….
-ब्रेकिंग: हिट अँड रन प्रकरणातील दिरंगाई भोवली, येरवडा पोलीस ठाण्यातील २ अधिकारी निलंबित
-विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; जूनमध्ये ‘या’ दिवशी होणार मतदान
-Health Update | सर्दी-खोकला असताना भात खाल्ला तर काय होते? वाचा सविस्तर