पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट मिळत आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आता अटक करण्यात आली आहे. आरोपी मुलासोबत असणाऱ्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे. आरोपी वेदांचे वडिल बिल्डर विशाल अग्रवाल यांना देखील पुढील १४ दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच आरोपी वेदांत हा सध्या बालसुधारगृहामध्ये आहे.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत संबंध असलेले सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आधीच खूनाची सुपारी दिल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यातच आता नातवाने अपघातात दोन तरुणांचा बळी घेतल्याने आजोबा सुरेंद्रकुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अपघातावेळी मुलासोबत त्यांचा ड्रायव्हर बसला होता. गंगाराम पुजारी याला सुरेंद्र अग्रवाल यांनी डांबून ठेवले आणि योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा कसा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल केला आहे. सुरेंद्र अग्रवाल यांना सुट्टीच्या न्यायालयासमोर हजर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल, वडिल विशाल अग्रवाल आणि आता स्वत: आरोपी वेदांत अग्रवाल यांचे सर्व कारनामे समोर येत आहेत. आरोपीला वाचवण्यासाठी वडिल आणि आजोबा खालच्या थराला जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये देखील संतापाची लाट उसळत आहे. दरम्यान, सुरेंद्र अग्रवाल यांनी नातू वेदांतवर अल्पवयीन म्हणून खटला चालण्याची मागणी न्यायालयाला केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग: हिट अँड रन प्रकरणातील दिरंगाई भोवली, येरवडा पोलीस ठाण्यातील २ अधिकारी निलंबित
-विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; जूनमध्ये ‘या’ दिवशी होणार मतदान
-Health Update | सर्दी-खोकला असताना भात खाल्ला तर काय होते? वाचा सविस्तर