पुणे : कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणांमध्ये गृह विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अपघात घडल्यानंतर वेळेत वरिष्ठांना माहिती न देणे आणि तपासात दिरंगाई केल्याचं ठपका ठेवत पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी या दोघांचे निलंबन करण्यात आलं आहे.
कल्याण नगर हिट अँड रन प्रकरणामुळे पुणे शहरासह संपूर्ण राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रसिद्ध बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातामध्ये दोन निष्पाप जीवांचा बळी गेला. यानंतर संबंधित अल्पवयीन चालकाला अवघ्या पंधरा तासात जामीन मिळाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पहायला मिळाली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट देत या प्रकरणांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
कारचालक अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान आता तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याचं ठपका ठेवत येरवडा पोलीस ठाण्यातील २ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; जूनमध्ये ‘या’ दिवशी होणार मतदान
-Health Update | सर्दी-खोकला असताना भात खाल्ला तर काय होते? वाचा सविस्तर
-हार्दिक पांड्या-नताशाचं बिनसलं? नताशा स्टॅनकोविकचा सिनेक्षेत्राला ‘रामराम’