Health : उन्हाळा आला की कलिंगड, खरबूजाला प्राधान्य दिले जाते. आपल्या शरिरातील पाण्याचा समतोल राखण्यासाठी कलिंगड खाल्ले जाते. कलिंगड खाल्याने तुमचे वजन, साखर डिहायड्रेशन कमी करण्यासाठी मदत करु शकते. कलिंगडामध्ये साधारण ९२% पाणी असते. मात्र, सध्याच्या काळात कलिंगडामध्ये मोठी भेसळ होत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यासंदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
तसेच कलिंगड आणि टरबूजामुळे विषबाधा झाल्याचे सांगणारे व्हिडीओही अलिकडे चिंता वाढवणारे ठरत आहेत. पण खरंच कलिंगड आणि टरबूज खाल्याने विषबाधा होत आहे का? फिजिशियन आणि कॉन्टेन्ट क्रिएटर डॉ. कोमल कुलकर्णी यांनी कलिंगड आणि टरबुजामुळे विषबाधा होते का या प्रश्नावर स्पष्ट उत्तर दिले आहे.
कलिंगड आणि टरबूजामुळे विषबाधा होण्याची २ कारणे
एक म्हणजे पिकवताना या भाज्यांमध्ये वापरलेले कृत्रिम रंग किंवा गोडवा वाढवणारे सिरप ज्यामुळे फळांची चव आणखी गोड होते आणि गर अधिक रसाळ दिसू लागतो. दुसरं कारण म्हणजे फळे ज्या मातीत पिकवली जातात त्या मातीतच मुळात हानिकारक बॅक्टरीया असू शकतात, असे डॉ. कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
कलिंगड आणि टरबूज जमिनीच्या अगदी जवळ वाढतात. ज्यामुळे ते सामान्यतः मातीमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंद्वारे दूषित होण्याची शक्यता असते. हे जीवाणू मुख्यतः कलिंगडाच्या सालीवर राहून वाढू शकतात व कलिंगड कापताना ते गरामध्ये सुद्धा मिसळू शकतात. त्यामुळे कलिंगड आणि टरबूज पिकवताना माती चांगली नसेल तर काय मानवी शरिरावर काय हानिकारक परिणाम होऊ शकतात…
साल्मोनेला: ताप, अतिसार, उलट्या आणि पेटके यासारख्या लक्षणांसह विषबाधा होते.
ई.कोली: किडनी निकामी होण्याचा धोका असतो. लहान मुलांसाठी अधिक धोकादायक ठरु शकते.
लिस्टेरिया: हा जीवाणू गर्भवती महिलांसाठी धोकादायक असू शकतो, कारण यामुळे गर्भपात, मृत जन्म किंवा नवजात मुलांमध्ये गंभीर संक्रमण होऊ शकते. हे जीवाणू उबदार आणि दमट वातावरणात वाढतात.
कृत्रिम रंग घातलेले कलिंगड सामान्यत: बाजारातून जर तुम्ही नेहमीपेक्षा फारच गडद रंगाचे कलिंगड विकत घेत असाल तर रंगाचा स्रोत लक्षात घेणं गरजेचं आहे.
कृत्रिम रंगांमध्ये शिसे किंवा मिथेनॉल सारखी हानिकारक रसायने असू शकतात, ज्यामुळे विषबाधा, पाचन समस्या आणि कर्करोगासारखे संभाव्य दीर्घकालीन धोके निर्माण होऊ शकतात.
कलिंगड खाण्यापुर्वी वाहत्या पाण्याने आणि ब्रशने कलिंगड धुवून घ्यावे आणि पृष्ठभागावरील जीवाणू कमी होऊ शकतात. अतिरिक्त संरक्षणासाठी व्हिनेगर आणि पाण्याचे १.३ अशा प्रमाणात द्रावण तयार करावे, आणि त्या पाण्यात कलिंगड धुवून घ्यावे. तसेच कलिंगड कापण्यासाठी वापरलेला चाकू देखील व्यवस्थित निर्जंतुकीकरण करून वापरावा.
महत्वाच्या बातम्या-
-दोनदा एफआयआर का? आरोपीला पिझ्झा का? अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली कारणे
-‘हो, त्या रात्री आमदार टिंगरे पोलीस स्टेशनमध्ये आले होते, पण…’; अमितेश कुमार यांनी दिली माहिती
-‘..म्हणून आरोपी वेदांत अग्रवालच्या रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही’; अमितेश कुमार असं का म्हणाले?
-“करके बैठा मै नशे, इन माय पोर्शे…”; आरोपी वेदांत अग्रवाल रॅप करत देतोय शिव्या अन् आई म्हणतेय…