पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी आणि विद्येचे माहेरघर तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यातील पोर्शे कार भीषण अपघातातील अल्पवयीन मुलास न्यायालयाने १५ तासांतच जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतरही १५ तासांत जामीन मिळाल्याने सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली. पैशाची मस्ती असलेल्या या मदमस्त पोराचा एक रॅप व्हिडिओ समोर आला.
जामीन मिळाल्यानंतर त्याने हे रॅप बनवल्याचे त्या रॅपमधील शब्दांमधून लक्षात येईल. अपघातामुळे आपल्याकडून दोघांचा बळी गेल्याचं त्याला काहीच वाटत नाही तसेच किंचितही संवेदना नसलेल्या अमानवी वृत्तीचा नमुना म्हणजेच हे रॅप असल्याचे दिसून आले आहे. बड्या बापाच्या बिघडेल पोराची ही मस्ती पाहिल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. त्यानंतर २३ मे रोजी या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत तो मुलगा एक रॅप साँग म्हणताना आणि शिव्या देताना दिसतो आहे. मात्र या व्हिडीओबाबत आता या मुलाच्या आईने समोर येत स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हटलं आहे अल्पवयीन मुलाच्या आईने?
“नमस्कार मी शिवानी अग्रवाल. अल्पवयीन आरोपीची मी आई आहे. मी मीडियाला विनंती करते की, व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या मुलाचा नाही. तो फेक व्हिडिओ आहे हे कृपा करुन लक्षात घ्या. माझा मुलगा बालसुधारगृहात आहे. मी पोलीस आयुक्तांना विनंती करते की, कृपा करुन त्याच्या सुरक्षेची काळजी घ्या. प्लीज, प्लीज, प्लीज.” असे अल्पवयीन मुलाची आई म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पैसे खाल्ल्याशिवाय ‘हे’ होऊच शकत नाही’; रवींद्र धंगेकरांचा पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप
-पुणेकरांनो सावधान! येत्या २ दिवसांत पुन्हा उन्हाचा कडाका वाढणार, हवामान विभागाचा अंदाज
-‘पोलीस महानालायक असतातच…’; पुणे अपघातावरुन केतकी चितळे पोलिसांवर संतापली
-ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देणाऱ्या ममता बॅनर्जींना कोलकाता न्यायालयाची चपराक; बावनकुळे म्हणाले,…
-कल्याणीनगर अपघाताचा पुणे वाहतूक पोलिसांनी घेतला धसका; शहरात अनेक भागात नाकाबंदी अन्..