पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे सर्व क्षेत्रात पडसाद उमटले आहेत. या अपघातावरुन अग्रवाल कुटुंबाचा छोटा राजनशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आता विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे क्राईम ब्रँचने पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी करत आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी विसाल अग्रवालला देखील हजर करण्यात आले आहे. दोघांची आमोरासमोर चौकशी सुरु आहे.
अग्रवाल कुटुंब सध्या चर्चेत आहे. यातच शिंदे गटाचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी पूर्वी झालेल्या एका वादात अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिल्याचा आरोप केला आहे, असे अजय भोसले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे देखील समोर आले. भावांसोबत असलेल्या संपत्तीच्या वादात अगरवाल यांनी छोटा राजनचा मदत घेतली होती. या वादात अजय भोसलेची हत्या करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांच्याविरोधात बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली नव्हती. त्यातच आता हा सगळा प्रकार पाहून आता सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवालने मुलाला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? पोलिसांची काही मदत घेतली किंवा कोणत्या मोठ्या व्यक्तीची मदत घेतली का?, याबाबतची सर्व चौकशी आता पुणे क्राईम ब्राँचकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी वकिलांचा नवा कांगावा; युक्तीवादात म्हणाले, ‘गाडी बिघडलेली…’
-राज्यात लोकसभेचे मतदान होताच अजित पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक; नेमकं कारण काय?
‘…म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट
-‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा