पुणे : राज्यातील लोकसभा निवडणुकीचे वातावरण थंड झाले आहे. पाचही टप्प्यातील निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. सर्व राजकीय पक्षांसह राज्यातील जनताही निकालाच्या प्रतिक्षेत आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबई येथे महत्वाची बैठक बोलावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७ मे रोजी सकाळी ११ ते २ यावेळेत गरवारे क्लब हाऊस मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला मंत्री, आजी, माजी खासदार, आमदार, २०२४ चे लोकसभा उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, प्रवक्ते, पॅरंट बॉडी जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला आणि युवक जिल्हाध्यक्ष, युवती विभागीय अध्यक्ष व समन्वयक आणि मुंबई विभागीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘…म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं गेलं’; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठा गौप्यस्फोट
-‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा
-अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?
-बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट