पुणे : पुणे शहारतील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातानंतर सर्व क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. तर अनेक राजकीय नेते मंडळी विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. या अपघात प्रकरणी भाजप नेते मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी उडी घेतली आहे. नाईट लाईफ काय फक्त कोरोगाव पार्कमध्येच सुरु आहे का?, असा संतप्त सवाल मोरेंनी केला आहे.
‘कोरेगाव पार्कमध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. पण त्यामागून जे राजकारण चालू दिसत आहे. त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येत आहे. शहरात नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का? ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूडमधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील नाईट लाईफ विषयी लक्ष द्यावे, सोबतच भुगाव, पिरंगुट या भागाकडे म्हणजेच मुळशी कडेही लक्ष द्यावे’, असा टोला वसंत मोरे यांनी नाव न घेता मुरलीधर मोहोळ यांना लगावला आहे.
‘ज्यांनी निवेदन दिली त्यांनी सुद्धा एन आय बी एम कोंढवा भागाकडे सुद्धा लक्ष द्यावे, नाहीतर असं म्हणावं लागेल कोरेगाव पार्कमध्ये जाणारी तरुण पिढी दारू पिण्यासाठी जाते आणि वरील भागांमध्ये नाईट लाईफसाठी जाणारी तरुण पिढी नारsळाचे पाणी पिण्यासाठी जाते का?’ असा सवाल करत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
कोरेगाव पार्क मध्ये जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता पण त्यामागून जे राजकारण चालू दिसतंय त्यामध्ये आपल्या पुण्याच्या काही नेत्यांची कीव येते.
नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्क मध्येच आहे का ?
ज्यांनी पुढाकार घेऊन कारवाया लावल्या त्या कोथरूड मधील पुढाऱ्यांनी जरा आपल्या भागातील pic.twitter.com/Vk4gcT73LK
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) May 23, 2024
‘कोणकोणत्या नेत्याचे कुठे कुठे नाईट लाईफमध्ये लागेबांधे आहेत. भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर जागेवर जाऊन लाईव्ह केले जातील. पोलीस यंत्रणेने फक्त कोरेगाव पार्क टारगेट न करता संपूर्ण पुणे शहर सुद्धा टार्गेट करावे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी म्हणून जर कुठे हिंसक आंदोलन झाली तर त्याला संपूर्णपणे जबाबदार ही भ्रष्ट यंत्रणा असेल चा इशारा देखील वसंत मोरे यांनी दिला आहे.
शहरात झालेल्या या अपघातानंतर आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवण्यात आले आहे. त्याचे वडिल प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. वरिष्ठ पातळीवर देखील राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर देण्यात येत आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी उडी घेतली असून काही सवाल त्यांनी पुण्यातील स्थानिक नेत्यांना केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?
-बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट
-पिंपरी चिंचवड महापालिका अॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू
-चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम
-‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!