बुद्ध पौर्णिमा : आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त बुद्ध पौर्णिमेचे महत्व जाणून घेणार आहोत. वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस बुद्ध जयंती म्हणून देखील साजरा केला जातो. हिंदू धर्मात गौतम बुद्धांना भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. गौतम बुद्धांनी जगाला उदात्त सत्याचा उपदेश केला. बौद्ध धर्माचे लोक बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवणीचे पालन करण्याची शपथ घेतात.
या खास प्रसंगी गौतम बुद्धांच्या काही शिकवणी पाहणार आहोत. भगवान गौतम बुद्धांच्या या शिवकवणीचे आचरण केल्याने आपले जीवन नक्कीच बदलून जाईल….
भगवान बुद्ध यांनी शांती आणि श्रीमंतीचा मार्ग दाखवला तो नेमका कोणता हे देखील पाहणार आहोत. सुखी समाधानी होण्याचे तसेच श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी प्रत्येकजण अपार कष्ट करत असतात. आपापल्या परीने धडपड करत राहतात. ती श्रीमंती कळावी आणि अनुभवता यावी यासाठी हा राजमार्ग भगवान बुद्ध सांगतात.
भगवान गौतम बुद्धांची शिकवण
लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे. पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे. त्यामुळे सगळ्यांशी वागताना चांगलेच वागा. चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार.
ज्या गोष्टींवर तुम्ही अधिक प्रेम करता अथवा चिकटून राहता नेमकी तिच गोष्ट तुम्ही गमावता.
कोणाचाही द्वेष आणि मत्सर बाळगून जीवनात आनंद मिळत नाही. मत्सर माणसाची मनःशांती नष्ट करतो.
भूतकाळातील वाईट काळाची आठवण ठेवू नये, भविष्याची स्वप्नं पाहू नयेत, फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करावं.
जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्यही आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
एखाद्या अज्ञानी माणसाशी कधीच वाद घालत बसू नये. कारण अज्ञानी माणूस बैलासारखा असतो. तो ज्ञानाने नाही तर आकाराने मोठा दिसतो.
संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो. हा स्वभाव दोन चांगले मित्र, प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो. यापासून दूर राहाणे कधीही फायद्याचे असते. कोणावरही विनाकारण संशय घेऊ नयेत.
तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही. कारण तुम्हाला त्याचा त्रास नक्की काय असतो याची पुरेपूर जाणीव असते.
महत्वाच्या बातम्या-
-‘भविष्यात जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर, जागेवर जाऊन…’; वसंत मोरेंचा इशारा
-अडीच कोटींच्या कारसाठी अग्रवालांकडून १७०० रुपयांचा चेंगटेपणा; नेमकं काय प्रकरण?
-बाणेर-बालेवाडी भागातील नाईट लाईफला आवर घाला, लहू बालवडकरांची आक्रमक भूमिका; थेट घेतली पोलिसांची भेट
-पिंपरी चिंचवड महापालिका अॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू
-चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम