पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागातील कार अपघाताचे पडसाद राजकारणवरही पडल्याचे दिसत आहे. शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचे पुत्र वेदांत अग्रवाल हा मद्यधुंद अवस्थेत अलिशान पोर्श कारने भरधाव वेगाने चालवत होता. यावेळी त्याने मध्यरात्री अडीचच्या सुमारास दुचाकीस्वारांना चिरडले. यामध्ये दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाला. यावरुन पोलीस आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर सामान्य जनता आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे.
या सर्व प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत या प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे. फडणवीसांच्या काही मुद्द्यांवर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी आक्षेप घेतला. अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात त्याला पिझ्झा देण्यात आला. अपघातानंतर ११ तासानंतरही त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले नसल्याचे धंगेकर म्हणाले. यावर आता भाजपचे नेते आणि माजी महपौर मुरलीधर मोहोळ यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?
“लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिले आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच केले आहे,” असे म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांवर निशाणा साधला आहे.
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच !
कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत… https://t.co/22w6GQgmbW pic.twitter.com/MpO0QVQkUn
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) May 22, 2024
मंगळवारीही उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी हेच सांगितले की, या प्रकरणात कलम 304 हे पहिल्यापासून लावले आहे, म्हणजे मूळ एफआरआय दाखल करतानाच ! ही 19 तारखेचीच कॉपी तुमच्या माहितीसाठी ! कलम 304 त्यात आधीपासूनच आहे. त्यामुळे ‘साप-साप’ म्हणून ‘भुई धोपटणे’ हे धंदे सोडून द्या. पुणेकर तुम्हाला चांगलंच ओळखून आहेत, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: विशाल अग्रवालला बेल की जेल? वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit And Run | वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकचा प्रयत्न
-‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल
-‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप
-नंबरप्लेट नसताना वाहन चालवत असाल तर सावधान, आरटीओचे मोठे पाऊल; वितरक अडचणीत येणार