पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातातील मुख्य आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली नाही. मात्र त्याचे वडिल प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील विधीसंघर्ष आरोपीचा वडील विशाल अग्रवालला आज पुणे न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच जमलेल्यांचा संताप पहायला मिळाला आहे. न्यायालयामध्ये परिसरात पोहोचताच विशाल अग्रवालवर शाई फेकीचा प्रयत्न करण्यात आला.
विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे विशाल अग्रवाल बचावला. वंदे मातरम संघटनेने हे पाऊल उचलल्याचे पहायला मिळाले आहे. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेच्या ५ ते ८ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशाल अग्रवालला घेऊन आलेल्या पोलीस व्हॅनवरती शाई फेकण्यात आली.
View this post on Instagram
“आम्ही विशाल अग्रवालच्या तोंडावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावर शाई पडली. पण नंतर तो पोलिसांमुळे बचावला आहे. कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातासाठी विशाल अग्रवाल हा त्याच्या मुलापेक्षा अधिक जबाबदार आहे. पुण्यातील पबवर कारवाई झाली पाहिजे. त्यांचा परवाना रद्द झाला पाहिजे. आम्ही याठिकाणी विशाल अगरवालला धडा शिकवण्यासाठी आलो होतो. त्याच्या मुलाने २ निष्पापांचे जीव घेतले आहेत. विशाल अग्रवाल याच्यावर आधीपासून गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर मोकातंर्गत कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल
-‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप
-नंबरप्लेट नसताना वाहन चालवत असाल तर सावधान, आरटीओचे मोठे पाऊल; वितरक अडचणीत येणार
-बाप से बेटा सवाई अन् सर्वांवर आजोबा भारी! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध