पुणे : कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघाताचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. मध्यरात्री भरधाव वेगाने अलिशान कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुलगा हा अल्पवयीन असून, त्याची १५ तासांच्या आत जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचे नाव जोडले जात आहे.
आग्रवाल कुटुंबाने पोलिसांवर दबाव आणल्याचीही मोठी चर्चा आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही जनतेचा रोष कायम आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमदार @suniltingre सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे!
याचे उत्तर द्या मग..
१. गेले का होतात तुम्ही पोलिस ठाण्यात मध्यरात्री?
२. एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी कितीवेळा असे मध्यरात्री पोलिस ठाण्यात पोचला आहात?
३. प्रकरणाची माहिती फोनवर…— Ambadas Danve (@iambadasdanve) May 22, 2024
“आमदार सुनील टिंगरे सांगतात की मी दबाव टाकला नाही. हा शेंगा खाऊन टरफल लपविण्याचा प्रकार आहे. मग एका फोनवर एका माणसाच्या फोनवर तुम्ही यापूर्वी किती वेळा असे मध्यरात्री पोलीस ठाण्यात पोहचले आहात? तुम्ही पोलीस ठाण्यात मध्यरात्री का गेला होता? प्रकरणाची माहिती फोनवर घेतली जाते अनेकदा अशा वेळी. यासाठी थेट ठाण्यात कोणासाठी आणि कशासाठी गेले होते? याची उत्तरे खरं तर अजित पवारांनी दिली पाहिजे”, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप
-नंबरप्लेट नसताना वाहन चालवत असाल तर सावधान, आरटीओचे मोठे पाऊल; वितरक अडचणीत येणार
-बाप से बेटा सवाई अन् सर्वांवर आजोबा भारी! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध