पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात शहरातील प्रसिद्ध बिल्डरच्या मुलाने आपल्या अलिशान कारने दोघाजणांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल हा मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री भरधाव वेगाने गाडी चालवत होता. गेल्या २ दिवसांपासून या प्रकणातील अनेक वेगवेगळे खुलासे होत आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या वेदांत अगरवालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
विशाल अग्रवाल यांचे सरकारी यंत्रणेशी लागेबांध असल्यामुळे त्याचा मुलगा वेदांतवर कठोर कारवाई झाली नसल्याचं स्पष्ट पहायला मिळाले. त्यातच त्याचे आजोबा म्हणजे विशाल अगरवाल यांचे वडिल सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन सोबतही लागेबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आपल्या भावांसोबत झालेल्या वादावरुन सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी अजय भोसले यांना ठार मारण्यासाठी छोटा राजनला सुपारी दिली होती. तसा अजय भोसले यांच्यावर गोळीबार झाला, असा आरोप आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयामध्ये सुरु आहे. यावरुन अजय भोसले यांनी अगरवाल कुटुंबाविरोधात भाष्य केले आहे. यावरुन अगरवाल संपूर्ण कुटुंबच क्रिमिनिल असल्याचं स्पष्ट झाले आहे.
“अग्रवाल कुटुंबावर राजकीय वरदहस्त आहे, त्यांचा आर्थिक व्यवहार जोरात असल्याने ते जातील तिकडे कायदा विकत घेतात. संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल आहे. कुटुंबातील सर्व लोकांवर दोन-दोन गुन्हे दाखल आहेत. आतादेखील अपघात प्रकरणानंतर आपण पैशांच्या जोरावर आपण सगळे काही विकत घेऊ, असे त्यांना वाटते. ती मोठी लोक आहेत, त्यांना कायदा-सुव्यवस्थेची भीती नाही”, असे अजय भोसले यांनी सांगितले आहे
महत्वाच्या बातम्या-
-नंबरप्लेट नसताना वाहन चालवत असाल तर सावधान, आरटीओचे मोठे पाऊल; वितरक अडचणीत येणार
-बाप से बेटा सवाई अन् सर्वांवर आजोबा भारी! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध
-Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश
.