पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातावरुन पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पहायला मिळत आहे. कल्याणीनगरमध्ये नुकत्याच झालेल्या अपघातामध्ये प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवालचा मुलगा वेदांत अगरवालने विना नोंदणी कार वापरली होती. अल्पवयीन, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वेदांतने भरधाव वेगाने कार चालवताना दोघांना चिरडले. त्यानंतर आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विनानोंदणी रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कारवाई सुरु केली आहे.
आरटीओच्या भरारी पथकांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. विनानोंदणी वाहने आढळल्यास त्याची विक्री करणाऱ्या वितरकाचा व्यावसाय परवाना निलंबित करण्याचे पाऊल आरटीओने उचलले आहे. कल्याणीनगरमधील अपघातातील पोर्श मोटारीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. यामुळे आरटीओतील वाहननोंदणीच्या प्रक्रियेबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर आरटीओने शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या विनानोंदणी वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
पुणे शहरात रस्त्यावर विनानोंदणीची वाहने दिसली तर वाहनाची विक्री करणाऱ्या वितरकावर कारवाई केली जाणार आहे. वितरकांना याबाबत आरटीओकडून सूचना देण्यात आल्या आहेत. वितरकाने विनानोंदणी वाहन ग्राहकाला देऊ नये, असेही बजावण्यात आले आहे. विनानोंदणी वाहन दिसल्यास वितरकांना व्यवसाय परवाना निलंबित केला जाणार आहे. हा परवाना १५ दिवसांपासून ६ महिन्यांच्या कालावधीपर्यंत निलंबित केला जाणार असल्याचे देखील आरटीओकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बाप से बेटा सवाई अन् सर्वांवर आजोबा भारी! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध
-Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश
-Kalyaninagar Hit & run: अखेर आमदार टिंगरेंनी सोडलं मौन, म्हणाले, “विशाल अगरवालचा फोन आला होता, पण…”