पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका पोर्शे कारने बाईकला धडक दिली. शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल आगरवालचा मुलगा वेदांत अगरवालने मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडले. या अपघातामध्ये सुशिक्षित दोन तरुणांचा मृत्यू झाला. दारूच्या नशेत गाडी भरधाव वेगाने चालवणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालला तुरुंगात रॉयल ट्रीटमेंट मिळाली आणि १५ तासांमध्ये जामीन मंजूर झाला. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करताना प्रचंड दिरंगाई आणि चालढकल केल्याचा आरोप झाला होता.
अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याच्या रक्ताचा अहवाल आता कळीचा मुद्दा ठरला होता. वेदांतने मद्यप्राशन केले होते, त्यामुळे पोलिसांनी त्याच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
Alcohol Test
सरकारी रुग्णालयात Alcohol test साठी आरोपी आमच्याकडे आणले जातात तेव्हा पोलीस एक memo घेऊन येतात.
आरोपी minor असेल तर त्यावर विधिसंघर्षग्रस्त बालक असे लिहितात, आणि adult असेल तरच त्याचे नाव लिहितात.
त्यानंतर डॉक्टर त्याची basic clinical तपासणी करतात, vitals लिहितात.
— डॉ. मीरा 🇮🇳(💛 DHONI💛) (@DrRisingStar9) May 21, 2024
या ट्वीटमध्ये पुणे अपघात प्रकरणातील पोलिसांचा तपास आणि वेदांत अगरवाल याच्या ब्लड रिपोर्टविषयी सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वेदांतचा ब्लड रिपोर्ट अद्याप आला नसल्याची माहिती मंगळवारी दिली होती. त्यामुळे ब्लड रिपोर्टविषयीचे गूढ कायम आहे. या सगळ्यावरही या पोस्टमधून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
वेदांतने मद्यप्राशन केले आहे की नाही, याची चाचणी कोणत्या रुग्णालयात किंवा फॉरेन्सिक लॅबमध्ये झाली? ही चाचणी कोणत्या डॉक्टरने केली? फॉर्ममध्ये मद्यप्राशानाविषयी काय निष्कर्ष नोंदवले होते आणि काय शेरा दिला होता? याविषयीही पोस्टमधून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-बाप से बेटा सवाई अन् सर्वांवर आजोबा भारी! विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध
-Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश
-Kalyaninagar Hit & run: अखेर आमदार टिंगरेंनी सोडलं मौन, म्हणाले, “विशाल अगरवालचा फोन आला होता, पण…”