पुणे : पुणे शहारातील कल्याणीनगर परिसरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने पोर्शे या अलिशान कारने मध्यरात्री दोघांना चिरडलं. ६०० कोटींचा मालक असलेल्या विशाल अगरवालचे चिरंजीव वेदांत अग्रवाल हा मध्यधुंद अवस्थेत होता. या मुलाच्या शाळेतील कृत्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी धक्कादायक खुसाला केला आहे.
या वेदांत अगरवालमुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा सोडावी लागली होती. सोनाली तनपुरे यांनी त्यांच्या मुलासोबतचा शाळेतील एक किस्सा सांगितला आहे. “मी वेदांत अगरवालसह काही मुलांची तक्रार त्यांच्या पालकांकडे केली होती. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर मी माझ्या मुलाला शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत शिकवले”, असं सोनाली तनपुरे यांनी सांगितलं आहे.
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या…
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.
— Sonali Tanpure (@TanpureSonali) May 21, 2024
सोनाली तनपुरे यांनी ट्विट करून बिल्डरच्या प्रतापी मुलाचा भांडाफोड केला आहे. सोनाली यांनी नाव न घेता त्या मुलाचा उल्लेख केला आहे. ”कल्याणीनगर येथील कार ॲक्सिडंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या. संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता”, असा गंभीर आरोप सोनाली तनपुरे यांनी केला आहे. एकंदरीतच अग्रवाल आणि त्याच्या मुलाबाबतचे आणखी काही धक्कादाायक खुलासे येत्या काळात होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले महत्त्वाचे आदेश
-Kalyaninagar Hit & run: अखेर आमदार टिंगरेंनी सोडलं मौन, म्हणाले, “विशाल अगरवालचा फोन आला होता, पण…”