पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने भरधाव वेगाने अलिशान कारमधून जाताना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. न्यायालयाने १५ तासांच्या आत आरोपी वेदांत आगरवाल याला जामीन मंजूर केला. या प्रकरणांमध्ये राजकीय दबाव आणला गेला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वेदांत अगरवाल याने २ तरुणांना चिरडल्यानंतर आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना पुणे पोलिस आयुक्तांना फडणवीसांकडून देण्यात आल्या असलयाचे बोलले जात आहे. तसेच आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास त्यावेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ते खरे असेल तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करा, अशा सूचना फडणवीस यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, १७ वर्षीय मुलाला न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला. तसेच अपघातावर ३०० शब्दाचा निबंध लिहावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. तसेच या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाईचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून घेतली असल्याचे देखील बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Kalyaninagar Hit & run: अखेर आमदार टिंगरेंनी सोडलं मौन, म्हणाले, “विशाल अगरवालचा फोन आला होता, पण…”
-पुण्यात पुढील ४ दिवस पावसाची जोरदार शक्यता; हवामान खात्याने दिले अपडेट…
-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर