Sunflower : सुर्यफूल दिलायला सुंदर असतात. महाराष्ट्रात पिकवले जाणारे सुर्यफुलाच्या बियांचे अनेक गुणकारी फायदे आहेत. सुर्यफूलाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. हे हृदय आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. आज आपण या सुर्यफूलाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.
सुर्यफूलाच्या बियांचे फायदे
सूर्यफुलाच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, प्रथिने, मँगनीज, जस्त, लोह, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी ६ आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात.
सुर्यफुलाच्या बिया थायरॉईडचा धोका कमी करतात. सुर्यफुलाच्या बिया हाडे मजबूत करण्यास देखील मदत करतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर मानले जाते. मधुमेही रुग्ण अल्प प्रमाणात ते स्नॅक्स म्हणून खाऊ शकतात.
सुर्यफूलाच्या बियांचे सेवन केल्याने शरीर सर्दी, खोकला, ताप इत्यादी आजारांशी लढण्यास सक्षम बनते. या बिया रोगप्रतिकारक शक्तीसाठीही फायदेशीर मानल्या जातात.
सूर्यफुलामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण नगण्य असते. फायबरचे प्रमाणही चांगले असते. याचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलची पातळीही संतुलित राहते.
सुर्यफुलाच्या बिया पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर मानल्या जातात. याचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी इत्यादी आजारांपासून आराम मिळतो.
कशा खाल सुर्यफूलाच्या बिया
सुर्यफुलाच्या बियांचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. सुर्यफुलाच्या बिया नेहमी सोलून काढल्या पाहिजेत. ते भाजून स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो.
तुम्ही या बिया सॅलडवर शिंपडून, ओट्समध्ये घालून, भाज्यांमध्ये मिसळून, केक किंवा कुकीजमध्ये घालून आणि ब्रेड आणि पीनट बटरमध्ये मिसळून खाऊ शकता.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात होर्डिंग कोसळल्याप्रकरणी जागामालकासह होर्डिंग कंपनीवर गुन्हा दाखल
-…अन्यथा बैलगाडा शर्यतीत भाग घेता येणार नाही; बैलगाडा शर्यती संदर्भात नवीन नियमावली जाहीर
-Kangna Ranaut : ‘…तर मी बॉलिवूड क्षेत्र सोडून देणार’; कंगना रणौतचा मोठा निर्णय
-Entertainment : नवाजुद्दीन सिद्दीकीला आवडते ‘ही’ देशी दारु; किंमत ऐकून व्हाल थक्क