Kangna Ranaut : बॉलिवूड क्षेत्र आणि राजकारणात सध्या सर्वात चर्चे असणारी अभिनेत्री कंगना रणौत ही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाकत उतरली आहे. आपल्या बेधडक वक्तव्याने नेहमीच चर्चेत असणारी कंगना रणौत ही भाजपकडून हिमाचल प्रदेशमधील मंडी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून कंगनाने आपल्या प्रचाराला जोरदार सुरवात केली. त्यानंतर आता कंगना आणखी चर्चेत आली आहे.
कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यास बॉलिवूड सोडणार का? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्यावर तिने होकारार्थी उत्तर दिल्याचे पहायला मिळाले आहे.
काय म्हणाली कंगना रणौत?
“हे चित्रपट विश्व खोटेआहे आणि तिथली प्रत्येक गोष्ट बनावट आहे. ते खूप वेगळं वातावरण तयार करतात. पाण्याच्या खोट्या बुडबुड्याप्रमाणे ते चकमकीत विश्व निर्माण करतात. त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याकडे आकर्षित होतात. पण हेच सत्य आहे.”
“मी खूप उत्साही व्यक्ती आहे. मला नोकरी करावी लागेल म्हणून मी कधी केली नाही. चित्रपटसृष्टीतही मी लिहिण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा मी भूमिका साकारून कंटाळले, तेव्हा दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. त्यामुळे माझे मन वेगळ्या प्रकारे काम करू लागते आणि मला आवडीने काम करायला आवडते.”
View this post on Instagram
“खरंतर एखाद्या व्यक्तीने एकाच करिअरमध्ये पुढे मार्गक्रमण करत राहावे. मला अनेक दिग्दर्शक म्हणतात की, आमच्याकडे एक चांगली हिरोइन आहे. तुम्ही ही इंडस्ट्री सोडून जाऊ नका. मी अभिनय चांगला करते, पण ठीक आहे, ते सुद्धा एकप्रकारे कौतुक झाले. मी त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहते”, असेही कंगना रणौत म्हणाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Entertainment : नवाजुद्दीन सिद्दीकीला आवडते ‘ही’ देशी दारु; किंमत ऐकून व्हाल थक्क
-सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; ‘गुलाल आपलाच’ म्हणत ठिकठिकाणी बॅनर
-Baramati News : बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार भिडणार? काय आहे राजकीय परिस्थिती
-तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक
-पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स