बारामती : महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील मतदारसंघातील प्रचाराच्या सांगता सभा झाल्या. राज्यातील तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची कामगिरी बजावली. बारामती, शिरुर, मावळ आणि पुणे लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी अजित पवारांनी प्रचारसंभाचा धडाका लावला होता. त्यातच बारामतीमध्ये विशेष लक्ष दिले आहे.
या निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांची प्रकृती बिघडली होती म्हणून ते काही दिवस उपचार घेऊन आराम करत होते. त्यानंतर त्यांनी पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराला हजेरी लावली होती. आणि आज अजित पवारांनी आज सकाळी सकाळी बारामतीमधील विकासकामांची पाहणी केली.
बारामती लोकसभा निवडणुकीनंतरही अजित पवार बारामतीमध्ये तळ ठोकून होते. बारामतीमध्ये त्यांनी व्यापाऱ्यांसह विविध घटकांचे मेळावे घेतले. बारामतीमधील प्रलंबित विकासाकामांसाठी आचारसंहिता संपल्यावर पाठपुरावा करुन कार्यवाही करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. सकाळी विकास कामांची पाहणी करून त्यांनी वैयक्तिक गाडी घेण्यासाठी जनता दरबार घेतला.
त्यातच अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार सध्या बारामतीमध्ये अॅक्टिव्ह आहेत. शरद पवार यांच्या पक्षात सहभागी झालेले युगेंद्र पवार हे आठवड्यातील मंगळवारी पक्षाच्या कार्यलयात बसून नागरिकांच्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले जात आहे. या माध्यमातून ते आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा सामना पहायला मिळाला. त्यानंतर आता आगामी विधानसभेला देखील पवार विरुद्ध पवार सामना पहायला मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-तुम्हालाही उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे का? मग आजच ही सवय बदला, आरोग्यासाठी ठरते हानिकारक
-पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स
-बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू
-Baramati | अजितदादांचं बॅक टू वर्क सुरु; सकाळी केली विकास कामांची पाहणी
-Pune News : धक्कादायक! पुण्यात गॅस चोरी करताना झाला मोठा स्फोट अन्…