पुणे : मागील आठवड्यापासून राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या शुक्रवारपर्यंत २४ मे पर्यंत मराठवाडा, विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्रातील काही भागत गारपीटीचाही अंदाज वर्तवला आहे. कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अनुकूल हवामान परिस्थिती असल्याने ६ जून रोजी कोकणात मान्सूनचे आगमन होणार असल्याचेही हवमान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि निकोबार बेटांवर पुढील ४८ तासात नैऋत्य मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे केरळ आणि राज्यात देखील मान्सून वेळेवर दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवला आहे.
३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचेल. यामुळे राज्याच्या इतर भागात मान्सूनच्या आगमनाबाबत उत्सुकता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मान्सून ५ जून रोजी गोव्यात दाखल होऊन ६ जूनपर्यंत कोकणात पोहोचू शकतो. ७ जूनपर्यंत पुण्यात येण्याचा अंदाज आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बड्या बापाच्या बिघडेल मुलाचा ‘कार‘नामा; भरधाव कारने दोघांना चिरडले! तरुण, तरुणीचा जागीच मृत्यू
-Baramati | अजितदादांचं बॅक टू वर्क सुरु; सकाळी केली विकास कामांची पाहणी
-Pune News : धक्कादायक! पुण्यात गॅस चोरी करताना झाला मोठा स्फोट अन्…
-‘शाहरुख अन् करणचे ‘तसले‘ संबंध’; दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट
-मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी