पुणे : घाटकोपरमधील होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना घडल्याची बातमी ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातही एक होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. शहरातील मोशी भागामध्ये स्पाईन रोड मोशी येथील जयगणेश साम्राज्य चौकातील २० बाय ४० फूट आकाराचे होर्डींग गुरुवारी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडले. या दुर्घटनेमध्ये टेम्पो, कार, पत्र्याच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता पुणे-सोलापूर महामार्गालगत लोणी काळभोर या ठिकाणी देखील एक होर्डिंग कोसळले आहे.
त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एक घोडा जखमी झाला आहे. होर्डिंग शेजारी बँड पथक उभे होते, त्या बँड पथकावर पडल्यामुळे, बँड पथकाचे नुकसान झाले आणि घोडा गंभीर जखमी झाला आहे. पुणे सोलापूर हायवे लगत लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे.
लॉन्स येथे एक होर्डिंग रस्त्यावर पडले. यामध्ये एक घोडा गंभीर जखमी झाला आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कारवाई होताना दिसत नाही. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?
-‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…
-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…
-आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! आयफोनच्या ‘या’ मॉडेलवर मिळतेय 22 हजार रुपयांची सूट