पुणे : पुण्यात ‘महादेव बेटिंग अॅप’ संबंधी केलेल्या कारवाईमध्ये धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पुणे ग्रामी पोलिसांच्या पथकाने नारायणगावमध्ये महादेव बेटिंग अॅप’संबंधी कारवाई केली. नारायणगावातील एका इमारतीमधून तब्बल ६२ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑनलाईन जुगारांच्या आर्थिक व्यवहार आणि पैसा वळवण्यासाठी ४५२ बँक खात्यांचा वापर करण्यात आला.
‘महादेव बुक’ या बेकायदा बेटिंग ॲपच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. या ऑनलाईन सुरु असलेल्या जुगारातील पैसा परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय असल्याचे देखील अधीक्षक देशमुख यांनी सांगितले आहे. या प्रकरणी ९३ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आले आहे. त्यापैकी ८८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात कुणाल भट, समीर युनुस पठाण, अमजद खान, यश चौहान, रशीद कमाल रफीउल्ली यांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील आरोपी पदवीधर असून नारायणगावातील ऑनलाइन जुगाराचे कामकाज सांभाळत होते. महादेव बेटिंग ॲप’ संबंधी महत्त्वपूर्ण माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली होती. बेकायदा सट्टेबाजीसंदर्भात देशभरात कारवाई करण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४५ लॅपटॉप, ८९ मोबाइल, तसेच आरोपींच्या वापरातील १०१ मोबाइल आणि ४५२ बँक खात्यांचे पासबुक यासह अन्य साहित्य असा ६२ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपींनी ऑनलाइन सट्टेबाजीसाठी शेकडो बँक खात्यांचा वापर केला आहे. ही बँक खाती कोणाच्या नावाने काढलेली आहेत? तसेच, ही खाती काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे का, याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पाणीकपातीचं संकट टळलं? वाचा काय झाला बैठकीत निर्णय
-पुण्यात राज्य शुल्क विभागाची मोठी कारवाई; शहरात बनावट दारुसह इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त
-कतरिना कैफ होणार आई..?; कतरिनाच्या ‘त्या’ इन्स्टाग्राम पोस्टची होतेय चर्चा
-शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं ओरबाडला; केळी उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान